मोखाड्यात सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण सुरू

भगवान खैरनार
मंगळवार, 27 मार्च 2018

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील झालेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीनीची खरेदी विक्री, व नसलेल्या जमीनी दाखवून झालेल्या खरेद्या याशिवाय वाघ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी तसेच गभालपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत यांनी तहसिल कार्यालयासमोर 26 मार्च पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

मोखाडा तालुक्यात जमिन खरेदी - विक्री घोटाळा प्रकरणे अनेक महिन्यांपासुन चर्चेत आहेत. त्यामध्ये काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी संशयाच्या भोवर्‍यात सुरू असल्याचा आरोप होत आहे. तर तालुक्यात झालेल्या वाघ प्रकल्पातील बाधित प्रकल्पग्रस्त आदिवासींना न्याय मिळाला नाही. या घटनांची तड लावण्यासाठी संदीप  राऊत यांनी आमरण उपोषण सुरू केले असून नायब तहसीलदार पी. जी. कोरडे यांनी त्यांची भेट घेऊन यासंदर्भात उपोषण मागेघेण्याची विनंती केली मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषण कायम सुरू ठेवले आहे.

मोखाडा तालुक्यातील जमीन खरेदी विक्रीत मोठे  घोळ झालेले आहेत तर काही जमीनीचे प्रकरणे धांदात खोटी आहेत असे असतानाही या प्रकरणावर प्रशासनाकडुन आजवर केवळ चौकशीचा फार्सच सुरू असून दोषीवर कारवाई कधी होणार हा मुद्दा अनुत्तरितच असताना आता राऊत यांनी याविषयावर उपोषण करण्याचा ईशारा दिला होता   तर याच बरोबर गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुरू असलेले वाघ प्रकल्पचे काम अद्यापही चालूच आहे याशिवाय येथील बाधित शेतकऱ्यांना आजवर कसलीही नुकसान भरपाई दिलेली नाही यामुळे ही भरपाई मिळावी. 

याशिवाय गभालपाडा आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.मात्र याबाबत अद्याप पर्यंत कसलीही चौकशी न करता हे प्रकरण बंद झाल्याचा आरोप करत या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागण्यासाठी राऊत हे आजपासून उपोषनाला बसले आहेत.

Web Title: a social worker on hunger strike at mokhada