उन्हाच्या कडाक्‍यावर सौर टोपीची मात्रा 

दीपक शेलार  
शनिवार, 14 एप्रिल 2018

ठाणे - स्वच्छ, शाश्‍वत आणि नावीन्यपूर्ण ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यासाठी व्यापक जनजागृती होत असताना ठाण्यातील एका अवलियाने चक्क उन्हाचा कडाका शीतल करण्यासाठी नामी युक्ती योजिली आहे. प्रकाश गद्रे असे त्यांचे नाव असून उन्हातान्हात फिरताना ते चक्क डोक्‍यावर सौर टोपी घालून फिरतात. वैशिष्ट्यपूर्ण अशा या टोपीवर असलेल्या सौर पॅनेलमधून निर्माण झालेल्या ऊर्जानिर्मितीमुळे टोपीला बसवलेला पंखा गरगरा फिरून डोक्‍याला गार हवा मिळते, असा दावा गद्रे काकांनी केला आहे. गुरुवारी (ता. 11) ठाण्यातील भाजपच्या आत्मक्‍लेश आंदोलनात सहभागी होतानाही गद्रे काकांनी हीच सौर टोपी घालून उपस्थितांना अचंबित केले. 

ठाण्यातील खारकर आळीत राहणारे प्रकाश गद्रे आपल्या मित्र परिवारासह काही वर्षांपूर्वी श्रीलंकेतील कोलंबो येथे बहिणीकडे पर्यटनाच्या निमित्ताने गेले होते. तेव्हा त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या बहिणीने सोलर (सौर टोपी) भेट दिली. त्या वेळी 600 रुपये मूळ किंमत आणि 30 रुपये ड्युटी अशी 630 रुपये किंमत असलली टोपी घेऊन काका आले. दर वर्षी उन्हाळ्यात ही सौर टोपी गद्रे काका वापरतात. या प्रकारच्या टोप्या काकांसोबत गेलेल्या नागपूर येथील दोघांसह दापोली, कर्जत आणि पुणे येथील एकेका आहे. या सौर टोपीवर सौर पॅनेल असून कडक उन्हामुळे यातून ऊर्जानिर्मिती होऊन त्याद्वारे टोपीला बसवलेला पंखा फिरून उन्हाच्या कडाक्‍यातही गारेगार हवेची अनुभूती मिळून थंडावा जाणवतो. गेली पाच वर्षे ही सौर टोपी ते वापरत असून, या टोपीचा देखभालीचा खर्च शून्य आहे. तसेच टोपी धुताही येत असल्याने वापरण्यास सुयोग्य असल्याचे ते सांगतात. उन्हामध्ये ही टोपी तापमानातील उष्णता शोषून घेत असल्याने उष्णतेच्या काहिलीतही थंडाव्याची अनुभूती मिळते. त्यामुळे उन्हाची जराही झळ लागत नसल्याचा दावा गद्रे करतात. 

सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंखायुक्त टोपीमुळे डोक्‍याला आणि शरीराला आराम लाभत असल्याने सरकारनेही अशा टोपीचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे आहे. किंबहुना 24 तास उन्हातान्हात ऑनड्युटी असणाऱ्या पोलिसांसाठी अशा टोप्या वापरल्यास पोलिसांना उन्हाचा आणि पर्यायाने कामाचाही ताप कमी होण्यास मदत होईल. 
प्रकाश गद्रे, सौर टोपीधारक ठाणेकर 

Web Title: solar cap thane news summer