प्रयोगशील मुंबई!! पहिल्यांदाच करण्यात आला 'असा' प्रयत्न

मुंबईतील शिवडीचा काही भाग हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत येतो
Mumbai-Solar-Panel
Mumbai-Solar-PanelE-Sakal

मुंबई: शिवडीमध्ये (Sewri) शौचालयाच्या टेरेसवर पर्यावरणपूरक वीजनिर्मिती (Eco Friendly Energy Generation) करण्यात आली आहे. सौचालयांच्या टेरेसवर सोलर पॅनल (Solar Panel) बसवून ही वीज निर्मिती करण्यात आली असून मुंबईतील हा पहिलाच प्रयोग (First Time in Mumbai) ठरला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या वीज तुटवड्यावर तोडगा म्हणून पर्यावरणपूरक वीजनिर्मिती करण्याची संकल्पना राबवण्यात आली आहे. (Solar Panel Installed over Public Toilet First Time in Mumbai)

Mumbai-Solar-Panel
अनिल देशमुख ही मोगलाई नाही - जयश्री पाटील

"शिवडीतील अमन शांती नगर येथील शौचालयाच्या टेरेसवर सोलार पॅनेल बसवण्यात आले. त्यातून दहा स्ट्रीट लाईट पोलला कनेक्शन देण्यात आले. हा प्रयोग पर्यावरणपूरक असून यामुळे विजेची तसेच विजबिलाची बचत देखील होणार आहे. पुढील आठ महिन्यात उर्वरीत सर्व एकमजली शौचालयाच्या टेरेसवर ही संकल्पना राबवली जाईल", असे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.

"हा प्रयोग यशस्वी झाल्याने दहा शौचालयाच्या टेरेसवर सोलार पॅनेलची व्यवस्था करण्यात येणार असून यातून विजनिर्मिती करून त्याद्वारे लाइट पोल उभारण्यात येणार आहेत. या एका सोलार पॅनेल मधून आठ ते दहा लाईट पोलला प्रकाश मिळतो असे साधारणत: शंभर स्ट्रीट लाईट पोल लावण्यात येणार आहेत. यामुळे शिवडी पूर्व येथील संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळेस प्रकाशमान होईल", असा विश्वास पडवळ यांनी व्यक्त केले.

Mumbai-Solar-Panel
बोरीवलीला मिळाला भारतातील पहिला 'इको-फ्रेंडली' ट्रान्सफॉर्मर

शिवडी पूर्व येथील प्रभाग क्रमांक 206 मधील संपूर्ण परिसर हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत येतो. हा संपूर्ण परिसर गेली कित्येक वर्षभर दुर्लक्षित होता. त्यामुळे तेथील राहणाऱ्या नागरिकांना तसेच विशेष करून महिलांना व लहान मुलांना सायंकाळी 6 वाजल्यानंतर अंधार असल्याने रहदारी करण्यास समस्या यायची. स्ट्रीट लाईट पोल बसवण्यास मुंबई पोर्ट ट्रस्ट परवानगी देत नव्हते. त्यामुळे रहिवाशांना अंधारातच चाचपडत आपले काम करावे लागत होते.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com