मेट्रोच्या स्थानकांवर सौरऊर्जा पॅनेल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो-1 च्या मार्गावरील अंधेरी आणि घाटकोपर या स्थानकांवर सौरऊर्जा पॅनेल बसवण्यात आले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते कार्यान्वित होतील. मेट्रो प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण विजेपैकी 30 टक्के वीजनिर्मिती त्यातून होणार आहे.

पॅनेल बसवण्यासाठी मुंबई मेट्रो वन प्रा. लिमिटेडने (एमएमओपीएल) एका कंपनीशी करार केला आहे. लवकरच मेट्रोच्या अन्य स्थानकांवरही हे पॅनेल बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे विजेची मोठी बचत होणार असून, दर वर्षी दोन हजार 700 टन कार्बन उत्सर्जन थांबणार आहे. सौरऊर्जेसाठी प्रतियुनिट पाच रुपये 10 पैसे "एमएमओपीएल'ला मोजावे लागत आहेत. ही पॅनेल मेट्रो स्थानकांच्या छतावर बसवण्यात येणार आहेत. या पॅनेलद्वारे तयार होणाऱ्या विजेचा वापर मार्गावरील मेट्रो स्थानके, दिवे, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, सरकते जिने, पंप आणि दुरुस्तीच्या कामांसाठी होईल.

Web Title: solar power panel on metro station