esakal | शाळा सुरू करण्यापूर्वी लोकल प्रवासाचा प्रश्न सोडवा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शाळा सुरू करण्यापूर्वी लोकल प्रवासाचा प्रश्न सोडवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई (Mumbai) आणि परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहेत; मात्र त्याआधी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या लोकल (Train) प्रवासासाठी स्वतंत्र आदेश जारी करावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

मुंबई आणि परिसरातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मुंबईजवळ असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील वसई, कर्जत, कसारा, बदलापूर, कल्याण, टिटवाळा आदींसह नवी मुंबई-पनवेल परिसरातून शाळांमध्ये येत असतात. त्यामुळे त्यांच्या लोकल प्रवासाबाबत वेगळे आदेश काढण्याची मागणी शिक्षक आमदार नागो गाणार आणि शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

हेही वाचा: मुंबईतील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार? महापौरांनी दिलं उत्तर

मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या प्रवासासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले तरी त्याला कोणी जुमानत नाही. त्यामुळे लोकल प्रवासासाठी सरकारनेच आदेश जारी करावेत अशी मागणी केली आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासासाठी आतापर्यंत कोणत्याही निश्चित सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात संभ्रम असून ते तातडीने दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

loading image
go to top