'चोर मचाये शोर' म्हणत सोमय्यांची, प्रताप सरनाईकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

'चोर मचाये शोर' म्हणत सोमय्यांची, प्रताप सरनाईकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई - भाजपनेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ठाण्यातील विहंग गार्डन या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. सोमय्यांच्या आरोपानंतर सरनाईकांनीही आक्रमक होत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र सरनाईक यांचा दावा दाखल होण्या आधीच त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.

ठाण्यातील विहंग गार्डन इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केला आहे.  त्यासोबतच आता ठाण्यातील वर्तकनगर पोलिसात सोमय्यांनी सरनाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली . यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरेही उपस्थित होते.  सोमय्यांनी सरनाईक यांची तक्रार ठाणे मनपातही केली आहे.

किरीट सोमय्यांच्या आरोपनंतर सरनाईक यांनी शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत 'चोर मचाये शोर' अशा शब्दात सोमय्या यांनी सरनाईकांवर निशाना साधला.

somaiyya filed a complaint against Pratap Sarnaik in thane about illegal construction of vihang society 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com