esakal | राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये झालेत 'हे' बदल..
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये झालेत 'हे' बदल..

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये झालेत 'हे' बदल..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अनेक दिवसांनंतर महाराष्ट्रातील खाते वाटपाचा तिढा नुकताच सुटलेला पाहायला मिळाला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे कोणतही महत्त्वाचं खातं ठेवलं नाही. सर्व खाती महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना वाटण्यात आली. यामध्ये शिवसेनेकडे 22 राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 13 आणि कॉंग्रेसकडे 12 असा फॉर्म्युला पाहायला मिळाला. मात्र आता यामध्ये देखील बदल करण्यात आलाय. हा बदल करण्यात आलाय राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आलेल्या खात्यांमध्ये. 

महत्त्वाची बातमी : कमी किमतीत डॉलर घ्यायला गेले, हातात 'काय' आलं पाहा..

 

हे आहेत बदल : 

नव्या बदलानुसार जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांना देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी देखील याला मान्यता दिली आहे.  

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 23 डिसेंबरनंतर होणार असल्याची माहिती समोर येतेय. अशातच महाविकास आघाडीचा सत्तावाटपाचा खरा फॉर्म्युला त्यानंतरच स्पष्ट होताना पाहायला  मिळेल. 

महत्त्वाची बातमी :  हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय भूकंप होणार? 
 

28 नोव्हेंबर 2019  रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले.

Webtitle : some portfolios are changed between jayant patil and chagan bhujbal

loading image
go to top