esakal | "नाईट लाईफ फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठीच.."
sakal

बोलून बातमी शोधा

"नाईट लाईफ फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठीच.."

"नाईट लाईफ फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठीच.."

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: जगातील काही देशांच्या नाईट लाईफच्या धर्तीवर मुंबईतही नाईट लाईफची सुरुवात व्हावी यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतही नाईट लाईफ होणार अशी घोषणा केली होती. त्यावर राज्य सरकारकडून मान्यताही मिळाली. येत्या २७ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरू होणार आहे. यात मुंबईतील अनिवासी भागांमध्ये हॉटेल्स हे २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र यावार आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाईट लाईफ आणि महाविकासआघाडीच्या सरकारवर चांगलीच टीका केली आहे. नाईट लाईफ ही फसवी संकल्पना आहे असं त्यांनी म्हंटले आहे.

मोठी बातमी - "शरद पवारांना शहरी नक्षवाद्यांना वाचवायचं आहे"

नक्की काय म्हणाले नितेश राणे: 

"मुंबईतील नाईट लाईफ  ही मुंबईतल्या सामान्य लोकांसाठी नाहीये, तर मुंबईतल्या श्रीमंत लोकांसाठी आहे. मुंबईतील काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी नाईट लाईफ सुरू करण्यात आलीये, असं नितेश राणे यांनी म्हंटल आहे. "तसंच यासाठी कुणाच्या परवानग्या घेतल्या गेल्या आणि  नाईट लाईफ सुरू करण्याआधी,  "इंदू मिलमध्ये काय चालतं आणि कोणते लोकं तिथे जाऊन पार्ट्या करतात", असे सवाल देखील उपस्थित केलेत. 

"स्वत:चे खिसे भरण्यासाठी आणि स्वत:च्या स्वार्थासाठी ठाकरे सरकार ही नाईट लाईफ सुरू करत आहे". तसंच कर्मचाऱ्यांच्या पगारचं काय? लोकांना १२ तसंच पगार देऊन जर त्यांच्याकडून २४ तास काम काढून घेतलं, तर आम्ही शांत बसणार नाही" असंही नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणालेत.  

मोठी बातमी -  पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम..
 

एकूणच ही नाईट लाईफ फसवी आहे आणि सरकार फक्त आपले खिसे भरण्यासाठी नाईट लाईफ सुरू करतेय असे आरोप नितेश राणे यांनी केलेत.  

son of narayan rane nitesh rane targets minister aaditya thackeray over night life in mumbai