मुलगा रणवीरमुळे मिळते ऊर्जा - सोनाली

पीटीआय
शुक्रवार, 20 जुलै 2018

मुंबई - 'कर्करोगावर उपचार घेत असतानाच्या आव्हानात्मक काळात आपला मुलगा रणवीर हा माझ्यासाठी शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे, असे भावनिक उद्‌गार अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने काढले आहेत.

मुंबई - 'कर्करोगावर उपचार घेत असतानाच्या आव्हानात्मक काळात आपला मुलगा रणवीर हा माझ्यासाठी शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे, असे भावनिक उद्‌गार अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने काढले आहेत.

सोनाली बेंद्रेला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला असून, ती सध्या अमेरिकेत उपचार घेत आहे. रणवीरसोबतचे छायाचित्र तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याबरोबर तिने रणवीरबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. "रणवीर 12 वर्षांचा झाला, त्या क्षणापासून त्याने माझ्या हृदयाचा ताबा घेतला आहे. तेव्हापासून त्याचा आनंद, त्याचे सुख मी व गोल्डी बहलने केंद्रस्थानी मानले होते. म्हणूनच कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रणवीरला काय व कसे सांगायचे हा पेच आमच्यापुढे होता; पण त्याला सावरण्यास आमचे प्राधान्य असल्याने खरी माहिती देणे आम्हाला महत्त्वाचे वाटले. आपण समजतो त्यापेक्षा मुले अधिक संवेदनक्षम असतात,' असे सोनालीने म्हटले आहे. रणवीरच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी असल्याने सध्या मी त्याच्याबरोबर आनंदात वेळ घालवित आहे. त्याच्या खोडकरपणामुळे मला शक्ती मिळते, असेही तिने म्हटले आहे.

Web Title: sonali bendre cancer sickness