esakal | सोनाली कुलकर्णी आपल्या वाढदिवशी देणार ही अनोखी गिफ्ट
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील स्टाफला पीपीई किट््ससाठी आर्थिक मदत करणार

सोनाली कुलकर्णी आपल्या वाढदिवशी देणार ही अनोखी गिफ्ट

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्याच्या लाॅकडाऊनकाळात कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांनीही विविध ठिकाणी मदत करीत आहे. झी युवा डान्सिंग क्वीनची परीक्षक सोनाली कुलकर्णीने देखील अनोखे पाऊल उचलले आहे. १८ मे रोजी सोनालीचा वाढदिवस आहे आणि तिने आपला हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.

कोरोनाबाधितांच्या रक्तात होतायत गुठळ्या, सरकारनं दिली 'या' उपचार पद्धतीचा वापर करण्याची परवानगी

खरे तर सोनालीचा फॅन्स क्लब मोठा आहे. अगदी नटरंगपासून तिची सुरू झालेली यशस्वी इनिंग आजही तितकीच यशस्वी आहे, या कालावधीत तिने बरेचसे यशस्वी चित्रपट दिले आहेत आणि विविध भूमिका साकारून आपल्या चाहत्यांना नेहमीच काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न तिने केला आहे. तिने मराठी इंडस्ट्रीत आपल्या यशाची गुढी उभारली आहे. केवळ अॅक्टिंगच नाही तर डान्सिंग क्वीनसारख्या नृत्याच्या मंचावरही परीक्षक म्हणून आपला ठसा चांगलाच उमटविला आहे.

BMC ताब्यात घेणार मुंबईतील वानखेडे स्टेडियम, वानखेडेत होणार 'या' कोरोना रुग्णांचे उपचार

आपल्या चाहत्यांच्या ती नेहमीच संपर्कात असते आणि त्यांनी सोशल मीडियावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देत असते.  नुकताच तिला एका चाहत्याने प्रश्न विचारला की सध्या लाॅकडाऊन आहे आणि आता तुझा १८ मे रोजी वाढदिवस आहे. तू हा वाढदिवस कसा साजरा करणार आहेस...आपल्या चाहत्याचा प्रश्न ऐकल्यानंतर लगेच सोनालीला एक उत्तम कल्पना सुचली आणि ती कल्पना तिने आपल्या चाहत्याबरोबर आपली मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना सांगितली.

मृत कामगारांच्या कुटुंबांना बेस्ट उपक्रमाचा दिलासा; वारसांना सेवेत सामावून घेणार...

सगळ्यांना सोनालीची ही कल्पना खूप आवडली. ती कल्पना अशी आहे की, सोनालीला तिच्या वाढदिवशी कुणीही गिफ्ट म्हणून वस्तू न देता किंवा पाठविता त्याऐवजी पैसे द्यावेत. सगळ्यांनी ते पैसे जमा केल्यानंतर सोनाली तेवढेच पैसे आपल्या अकाऊंटमधून देणार आहे आणि हे सगळे पैसे पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील स्टाफला पीपीई किट््ससाठी देण्यात येणार आहेत. सोनालीची ही कल्पना भन्नाट आहे. खरे तर सोनालीने यापू्र्वीही मुख्यमंत्री सहायता निधीला मदत दिली आहे आणि आता आपल्या वाढदिवशी ती अशा प्रकारचे अनोखे गिफ्ट देणार आहे.

संकटाच्या वेळी मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी नेहमीच करण्याचा प्रयत्न करते. जिथे पैशाची मदत करण्याची गरज आहे तिथेसुद्धा मी ती केली आहे. वाढदिवस प्रत्येक वर्षी येतो आणि जातो. परंतु हा वाढदिवस माझ्या आयुष्यात कायमचा स्मरणात राहील.

- सोनाली कुलकर्णी

Sonali Kulkarni will give this unique gift on her birthday

loading image
go to top