esakal | शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल सोनिया गांधी यांचा 'मोठा' निर्णय..
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल सोनिया गांधी यांचा 'मोठा' निर्णय..

शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल सोनिया गांधी यांचा 'मोठा' निर्णय..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

"भाजप आणि शिवसेना एकत्र येणार नसतील तर शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आपण पुढे यायचे नाही" असं, कॉग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कळवले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय. 

शिवसेना आणि भाजप यांचे एकमेकांशी पटणार नसेल तर आपण सेनेच्या पाठीशी उभे रहायचं का ? अशी विचारणा महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी केली होती. त्यावर महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर युतीतील परिस्थिती कोणतीही असली तरी कॉँग्रेस जनतेचा कौल स्वीकारून विरोधी पक्षात बसणार असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी बातम्या वाचा : 

राम मंदिर निकालावर शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य..

"मुख्यमंत्री शिवसेनेचाच" - सुधीर मुनगंटीवार

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम करताना या राज्यातील जनतेच्या मुळ समस्या व त्यावरील उपाययोजना यावरच भर द्यावा. राज्यातील आर्थिक मंदी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या प्रश्नावर आक्रमक होवून सरकारला जाब विचारावा. अश्या सूचना शरद पवार यांनी दिल्यात.  

WebTitle : sonia gandhi on congress support to shivsena for government formation

loading image