esakal | शरद पवारांचा सल्ला स्वीकारला आणि सोनिया गांधीची नाराजी पत्करुन प्रणवदा मातोश्रीवर गेले
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांचा सल्ला स्वीकारला आणि सोनिया गांधीची नाराजी पत्करुन प्रणवदा मातोश्रीवर गेले

प्रणव मुखर्जी यांनी थेट  सोनिया गांधीना  विचारणा केली. जर शक्य असेल तर तूम्ही मातोश्रीवर जाणे टाळा असा सल्ला सोनिया गांधीनी त्यांना दिला.

शरद पवारांचा सल्ला स्वीकारला आणि सोनिया गांधीची नाराजी पत्करुन प्रणवदा मातोश्रीवर गेले

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई : दिवंगत प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांनी न मागता पाठींबा दिला होता. त्यावेळी शिवसेना  एनडीयेचा महत्वाचा घटक पक्ष होता. बाऴासाहेबांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना भेटण्याचे प्रणव मुखर्जींनी ठरवले. मात्र या भेटीला सोनिया गाधीं यांचा विरोध होता.मात्र सोनियांची नाराजी डावलून प्रणव मुखर्जी बाळासाहेबांना भेटले. ‘द कोयलीश ईअर्स’ या आपल्या आत्मचरीत्रात प्रणव मुखर्जी यांनी हा किस्सा  सांगितला आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत प्रणव मुखर्जी यांना एनडीयेच्या दोन घटक पक्षांनी जाहिर पाठींबा दिला होता. बाळासाहेब ठाकरे आणि नितीश कुमार यांच्या भूमिकेमुळे भाजप नेते नाराज होते. निवडणूक प्रचाराच्या निमीत्ताने प्रणव मुखर्जीचा मुंबई दौरा ठरला. या दौऱ्यादरम्यान प्रणवदांनी मातोश्रीवर भेट द्यावी अशी इच्छा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची होती. मात्र सोनिया गांधी यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे वेगळे मत होते याची कल्पना प्रणव मुखर्जी यांना होती. त्यामुळे मातोश्रीवर जायचे की नाही, या बद्दल प्रणवदादा गोंधळात होते. 

महत्त्वाची बातमी मन सुन्न करून टाकणाऱ्या क्रॉफर्ड मार्केट हिट अँड रन दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

मातोश्रीवर जाणे टाळा...

प्रणव मुखर्जी यांनी थेट  सोनिया गांधीना  विचारणा केली. जर शक्य असेल तर तूम्ही मातोश्रीवर जाणे टाळा असा सल्ला सोनिया गांधीनी त्यांना दिला. त्यानंतर प्रणवदांनी शरद पवारांना या भेटीसंदर्भात सल्ला मागितला. शरद पवारांची भूमिका सोनिया गांधीच्या बिलकूल विरुध्द होती. तूम्ही मातोश्रीला जायला हवे, बाळासाहेब आणि शिवसैनिकांची ही इच्छा आहे. मुंबईत येऊन तूम्ही बाऴासाहेबांना भेटायला गेले नाही, तर हा बाळासाहेबांचा वैयक्तीत अपमान ठरेल, असं शरद पवारांनी प्रणव मुखर्जींना स्पष्टपणे सांगीतल.

इतका काळ भाजपचा जुना मित्र असलेला हा व्यक्ती मला थेट पाठींबा देतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत बाळासाहेबांचा अपमान व्हायला नको. अस प्रणव मुखर्जी यांनी मनोमन ठरवल. त्यांनी शरद पवारांना मातोश्रीवर घेऊन जाण्याची विनंती केली. आणि प्रणव मुखर्जी मातोश्रीवर गेले. त्यांनी बाळासाहेबांना पाठींब्याबद्दल धन्यवाद दिले.

मातोश्री भेट- सोनिया गांधीची नाराजी 

मात्र प्रणवदा मातोश्रीवर जाणे हे सोनिया गांधी यांना आवडले  नव्हते. मुंबई दौऱ्यानंतर दिल्लीला पोहोचल्यावर प्रणव मुखर्जींना  कॉंग्रेस नेत्या गिरीजा व्यास यांचा मला फोन आला. त्यांनी सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांची मातोश्री भेटीवरची नाराजी दादांच्या कानावर घातली. या भेटीमागची माझी भूमिका सोनिया गांधी, अहमद पटेलांना सांगेल अस प्रणवदांनी व्यास यांना सांगीतले. मी स्वताहून हा विषय काढणार नाही हे मनाशी ठरवले. मात्र पुढे ही वेळ  कधी आलीच नाही. 

महत्त्वाची बातमी राज ठाकरेंचा नवा लूक 'या' फोटोत स्पष्ट दिसतोय, लोकप्रिय नेत्याने लूक बदलाय तर चर्चा तर होणारच

पवारांचा सल्ला का स्विकारला ?

शरद पवार हे UPA आघाडीचे विश्वासू आणि महत्वाचे नेते होते.  त्यांचा सल्ला अत्यंत महत्वाचा होता. UPA-2  सरकारमध्ये आघाडीत धुसफुस वाढली होती. अनेक निर्णयावरुन पवार नाराज होते. सरकारला दोन वर्षाचा कालावधी शिल्लक होता. त्यामुळे पवारांसारख्या जेष्ठ आणि महत्वाच्या नेत्याला दुखवणे योग्य नव्हते. त्यामुळे सोनिया गांधीची नाराजी पत्करुन मी पवारांचा सल्ला मानला अस प्रणव मुखर्जी यांनी या आत्मचरीत्रात लिहीले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

sonia gandhi was not happy pranab mukherjee went to meet balasaheb thackeray