'टाटा स्काय"वरून सोनी पिक्‍चर्स नेटवर्कच्या वाहिन्या गायब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

मुंबई - टाटा स्कायवरील सोनी पिक्‍चर्स नेटवर्कच्या सगळ्या वाहिन्यांचे प्रक्षेपण काही अंतर्गत कारणास्तव कालपासून थांबवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी सोनी पिक्‍चर्स नेटवर्कच्या वाहिन्या दिसत नसल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. याबाबत टाटा स्कायशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच स्पष्टीकरण दिले नाही. सोनी पिक्‍चर्स नेटवर्कने त्यांचे कोणतेही दर वाढवलेले नाहीत. टाटा स्कायवरून सोनीच्या सगळ्या वाहिन्या दिसत नसल्याने सोनीच्या प्रवक्‍त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गेल्याच महिन्यात सुरू झालेल्या सोनी मराठी वाहिनीचे प्रक्षेपणही काल सकाळपासून बंद आहे. सोनीच्या वाहिन्यांसाठी खास पैसे भरलेल्या ग्राहकांची निराशा झाली असून, त्यांना टाटा स्कायच्या ठराविक दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागत आहे. हे चुकीचे असल्याचे सोनीचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टाटा स्काय आणि सोनी मराठी यांच्यादरम्यान व्यावसायिक वाटाघाटी सुरू असल्याचे समजते.

Web Title: Sony Pictures Network Missing on Tata Sky