आता थंडीतही चाखा रसाळ हापूसची मजा, हापुस नवी मुंबईत APMC त दाखल

शरद वागदरे
Wednesday, 11 November 2020

कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याप्रमाणे चव, रंग, असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील मालावी जातीचा हापूस आंबा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाशी मार्केट मध्ये दाखल झाला आहे.

वाशी - कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याप्रमाणे चव, रंग, असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील मालावी जातीचा हापूस आंबा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाशी मार्केट मध्ये दाखल झाला आहे. फळ बाजारामध्ये एक डझनचे 1560 बॉक्स पेट्यांची आवक झाली असून डिसेंबर अखेरपर्यत या आंब्याचा हंगाम राहणार आहे. या आंब्याच्या एका किलोला 700 ते 900 रुपये दर मिळत आहे.

कोकणाचा राजा असणाऱ्या हापूस आंब्याप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतील मालावी हापूस आंब्याची चव रंग आहे. त्यामुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. यापूर्वी देखील दक्षिण आफिक्रतील मालावी हापुस आंब्याची मार्केट मध्ये आवक झाली होती. नोव्हेंबर ते डिसेंबर महिना हा या हापूस आंब्यांची महिना आहे.  रत्नागिरी व दापोली मधून हापूस आंब्याची कलमे आठ ते दहा वर्षापुर्वी आफ्रिकन देशात लागवड करण्यात आली होती. तर मागील तीन वर्षापासून या आंब्याचे उत्पादन सुरु असून असून आंब्याची निर्यात सुरु झाली आहे. असे फळ व्यापारी संंजय पानसरे यांनी स्पष्ट केले.

नोव्हेंबरमध्ये हिट आणि कोल्डशॉक, तर डिसेंबरमध्ये मुंबई गोठणार

गेल्या तीन वर्षापासून मालावी हापुस नवी मुंबई बाजारात समितीत दाखल होत आहे. या आंब्यास ग्राहंकाकडून चांगली मागणी असून आंब्याला चांगले दर मिळत आहेत, रत्नागिरी व आणि कर्नाटाकातील हापूस आंबा येण्यास बराचसा अवधी आहे. रत्नागिरी हापूससारखी चव असल्याने हा आंबा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
संजय पानसरे,
फळ व्यापारी

मुंबईत गोवंशाचा मृत्यू झाल्यास गोशाळा मालकास नोंदणी बंधनकारक; महापालिकेचाच निर्णय

फळांचा राजा म्हणून आंबा हा विकला जातो. पुर्वी आंबा हा फक्त एप्रिल ते जुन महिन्यातच मिळत होता. पंरतु आता तो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मिळू लागल्यामुळे आनंद होत आहे.
किरण रोडे,
ग्राहक

( संपादन - तुषार सोनवणे )

south african malawi alphonso reached navi mumbais APMC sold at 700 per kg


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south african malawi alphonso reached navi mumbais APMC sold at 700 per kg