कोरोना टेस्टिंग साठी 'फोन बूथ'; कोरोनाला लढा देण्यासाठी मुंबईत अनोखा प्रयोग

कोरोना टेस्टिंग साठी 'फोन बूथ'; कोरोनाला लढा देण्यासाठी मुंबईत अनोखा प्रयोग

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज वाढत जातोय. अशात त्यात कोरोनाची चाचणी पद्धत खूप वेळ घेणारी असल्यामुळे एका दिवसात हव्या तेवढ्या संशयितांची चाचणी करणं कठीण होतंय. मात्र यावर उपाय काढत कोरोना संशयितांच्या स्वॅब टेस्टिंगसाठी मुंबईत 'फोन बूथ' तयार करण्यात आले आहेत.

आतापर्यंत संशयितांच्या चाचणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना या संशयितांचे नमुने स्वतः घ्यावे लागत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती होती. तसंच या सर्व प्रक्रियेमध्ये खूप जास्त वेळ लागत होता. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या धर्तीवर आता मुंबईतही स्वॅब टेस्टिंग बूथ तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बुथच्या मदतीनं संशयीतांना अवघ्या २-३ मिनिटात SWAB नमुन्यांचं संकलन करता येणार आहे.

"चाचणीसाठी कमी वेळ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून हे बूथ तयार करण्यात आले आहेत". असं मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी म्हंटलंय. मुंबईत पहिलं बूथ कस्तुरबा रुग्णालयात तयार करण्यात आलंय.

असं असणार हे बूथ:

  • हे बूथ मुंबईत कस्तुरबाजवळ बनवण्यात आलं आहे.
  • दक्षिण कोरियामध्ये असलेल्या बूथमध्ये आणि या बूथमध्ये फरक असणार आहे.
  • या बूथमध्ये स्वॅब टेस्टिंगसाठी एक डॉक्टर उपस्थित असणार आहे.
  • प्रत्येक संशयितांचा नमुना अवघ्या १-२ मिनिटात घेतला जाणार आहे.
  • प्रत्येक चाचणीनंतर बुथमधली हवा शुद्ध आणि जंतुरहित केली जाणार आहे.
  • यासाठी 'प्लाज्मा एअर स्टरिलायझर' चा उपयोग केला जाणार आहे.
  • पावसाळ्यातही हे बूथ सक्षमपणे उभं राहू शकणार आहे.
  • PPE सुटची कमतरता असेल तरी डॉक्टर या बूथमध्ये जाऊन नमुने गोळा करू शकणार आहेत.
  • या बूथमध्ये बाहेरची हवा यायला जागा ठेवण्यात आली नाहीये.
  • त्यामुळे बुथच्या आतील हवा शुद्ध आणि स्वच्छ राहणार आहे.

हे बूथ तयार केल्यामुळे आता दिवसाला तब्बल १५०० नमुने तपासले जाणार आहेत. त्यामुळे आता आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक मदत होणार आहे. तसंच त्यांचं कोरोनाच्या विषाणूंपासून संरक्षण होणार आहे. हे बूथ सध्या कस्तुरबा रुग्णालयात तयार करण्यात आलंय. हळू हळू बाकी सर्व रुग्णालयांमध्ये लवकरच हे बूथ लावण्यात येईल असं बीएमसीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

special and unique phone booths for covid 19 testing in mumbai near kasturba hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com