
हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार असून त्यासाठी मंगळवार (ता. ५) ते शुक्रवार (ता. ८) दरम्यान दररोज रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ या वेळेत अप आणि डाउन मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत वाशी ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.