

Dharavi Redevlopment
ESakal
मुंबई : अपुरी कागदपत्रे किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व लाभार्थ्यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पात सामावून घेण्याच्या उद्देशाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वतीने दस्तावेज संकलनासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही मोहीम राबविली जाणार असून, त्यामध्ये सहभागी होणाऱ्या पात्र धारावीकरांना त्यांचे आवश्यक दस्तावेज डीआरपीसमोर सादर करून सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.