Panvel News: उत्सव काळात स्वच्छतेचा जागर! पनवेल पालिकेची यंत्रणा रात्रपाळीमध्ये कार्यरत
Panvel Municipal Corporation: दिवाळी सणानिमित्त पनवेल पालिकेमार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिकांकडून निर्माण होणारा कचरा वर्गीकृत स्वरूपात देण्याचे आवाहन केले होते.
पनवेल : प्रकाश, आनंदाच्या दिवाळी सणानिमित्त नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ वातावरण राहावे, यासाठी पनवेल पालिकेमार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी शहराच्या विविध भागांमध्ये रात्रपाळीमध्ये घनकचरा संकलन करण्यात आले.