esakal | 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 दरम्यान मतदार नोंदणीसाठी मुंबई शहरात विशेष मोहिमेचे आयोजन
sakal

बोलून बातमी शोधा

17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 दरम्यान मतदार नोंदणीसाठी मुंबई शहरात विशेष मोहिमेचे आयोजन

दिनांक 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये विशेष मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत.

17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 दरम्यान मतदार नोंदणीसाठी मुंबई शहरात विशेष मोहिमेचे आयोजन

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई, ता. 25 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

धक्कादायक बातमी ::  "नोव्हेंबर महिन्यात शरद पवारांचा निरोप घेऊन २ बडे नेते वर्षावर गेले होते, निरोप होता राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास तयार आहे" - प्रियम गांधी मोदी 

दिनांक 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये विशेष मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मोहिमेदरम्यान मुंबई शहर आणि जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघ स्तरावर दिनांक 5, 6,12 व 13 डिसेंबर रोजी शनिवार आणि रविवार या सुट्टयांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या, कृष्ण धवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र घेण्यात येतील. 

धक्कादायक बातमी :: "कसाबची साक्ष दिली तेव्हाच हे ठरवलं होतं", कसाबला ओळखणाऱ्या देविकाला व्हायचंय पोलिस

सर्व नागरिकांनी कुटूंबातील मयत झालेल्या व्यक्ती, दुबार नावे असलेले मतदार व स्थलांतरीत झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमेच्यावेळी फॉर्म क्रमांक 7 भरुन देऊन मतदार यादीतील नावांची वगळणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच http://www.nvsp.in या ठिकाणी देखील मतदार आपली आँनलाईन नोंदणी करू शकतात असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत  करण्यात येत आहे.

( संपादन - सुमित बागुल )

special event in mumbai and MMR region to sort faults in election list and enrolling new names