
Disabled Persons
ठाणे : दिव्यांगबांधवांना शासकीय योजना, सुविधा आणि सेवांचा लाभ अधिक सुलभ आणि परिणामकारक पद्धतीने मिळावा यासाठी नुकतेच ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असतानाच, आता या कार्यालयामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येणार आहे.