ठाण्यात उभारले जात आहे 1000 खाटांचे कोविड रुग्णालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात युद्धपातळीवर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणाऱ्या 1 हजार खाटांनी सुसज्ज अशा कोविड हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ठाणे : वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात युद्धपातळीवर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणाऱ्या 1 हजार खाटांनी सुसज्ज अशा कोविड हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता.8) आढावा घेतला.

मोठी बातमी ः सावधान! सायबर हल्ल्यांमध्ये दुपटीने वाढ; सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई येथील बीकेसी येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड-19 रुग्णालयाप्रमाणे ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे देखील 1 हजार खाटांचे कोरोनासाठीचे स्वतंत्र असे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्याचे आदेश शिंदे यांनी नुकतेच ठाणे महापालिकेला दिले होते. ज्युपिटर रुग्णालयाच्या तांत्रिक सहकार्याने हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. केवळ तीन आठवड्यात उभारण्यात येणारे हे रुग्णालय लॅब,  डायलिसिस,  ऑक्सिजन अशा सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहे.

मोठी बातमी ः मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदा सतावणार नाही 'ही' कटकट

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. याप्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य अधिकारी, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. अंकित ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते. 

हे वाचा ः सलाम 'त्यांच्या' कार्याला ! 'ते' सुद्धा करताय जीव धोक्यात घालून काम

रुग्णालयाच्या निधीसाठी भाजपचा विरोध
या रुग्णालयाच्या कामासाठी नगरसेवक निधीतून प्रत्येक 5 लाख रुपये घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाकडून तयार कऱण्यात आला आहे. या प्रस्तावाला शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा दिला आहे. भाजपाने मात्र त्याला विरोध केला असून भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी या याबाबतचे पत्र दिले आहे. या रुग्णालयाबाबत स्पष्टता नसल्याने आपला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special one thousand bed covid hospital construction starts in thane