मुंबईत 'बर्ड फ्लू'च्या निमित्ताने विशेष खबरदारी, चिकन शॉप्स चालकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश

मुंबईत 'बर्ड फ्लू'च्या निमित्ताने विशेष खबरदारी, चिकन शॉप्स चालकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश

मुंबई: राज्यात 'बर्ड फ्लू' दाखल झाल्याने मुंबई ही अलर्ट झाली आहे. 'बर्ड फ्लू'चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक तेथे मायग्रंट म्हणजे स्थलांतरित पक्षांची तपासणी करण्यात येणार आहे. चिकन विक्रेत्यांना सरकारनं आखून दिलेली नियमावली पाळण्याचे निर्देश दिले आहेत.

'बर्ड फ्लू'च्या पार्श्वभूमीवर पर परराज्यातील कोंबड्याला बंदी घालण्यात आली आहे. यातून संसर्ग पसरण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. शिवाय ज्या ठिकाणी पक्षांचा संशयास्पद मृत्यू होईल त्या ठिकाणी तातडीने तपासणी करण्याचे आदेश पशु संवर्धन विभागाने दिले आहेत.

मुंबईत 'बर्ड फ्लू' चे प्रकरण समोर आलेले नाही, असे असले आवश्यक ती काळजी घेण्यात येत असल्याचे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले. मुंबईत दररोज 1000 ते 1200 टन चिकन विकल्या जातात. चिकन विक्रेत्यांना स्वछतेसह सरकारनं आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे ही डॉ रानडे यांनी सांगितले.

मुंबईला 'बर्ड फ्लू'चा कोणताही धोका नसून लोकांनी घाबरून जाऊ नये. लोकांनी बिनधास्त दाबून चिकन खावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईत पोल्ट्री फार्म नसल्याने काळजी करण्याचे काहीही कारण नाही. मुंबईत तळेगाव, चाकण, शिरूर, शिक्रापूर, नाशिक, सासवड, नारायणगांव, संगमनेर या ठिकाणाहून अधिकतर कोंबड्या येत असतात. या ठिकाणी 'बर्ड फ्लू'चे एक ही प्रकरण समोर आले नसल्याने काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे ही डॉ रानडे यांनी सांगितले.

मुंबईला 'बर्ड फ्लू'चा कोणताही धोका नाही. चिकन तसेच अंडी खाल्ल्याने 'बर्ड फ्लू' संसर्ग होतो हा गैरसमज आहे. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. लोकांनी मनसोक्त चिकन आणि अंडी खावीत, आपल्या आरोग्याची हेळसांड करू नये.
डॉ, अजित रानडे , अधिष्ठाता , पशु वैद्यकीय महाविद्यालय

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Special precaution bird flu Mumbai instructions chicken shop operators follow rules

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com