कोरोनानंतर आताची शिक्षण पध्दती निकामी होणार, बघा काय म्हणताहेत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी..

कोरोनानंतर आताची शिक्षण पध्दती निकामी होणार, बघा काय म्हणताहेत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी..

मुंबई, ता. २० : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे देशातील पुरवठ्याची साखळी पूर्णपणे विस्कळीत होणार असून कामाच्या स्वरुपातही अमूलाग्र बदल होतील. आजच्या या परिस्थितीत आपण औद्योगिक उत्क्रांतीच्या ४.० टप्प्यात आहोत. परिणामी आपले आयआयटी, इंजिनिअरिंग आणि इतर शैक्षणिक अभ्यासक्रम देखील कालबाह्य ठरण्याची शक्यता निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. 

या महामारीमुळे एक असे विचित्र आव्हान आपल्यापुढे उभे केले आहे ज्याचा आपण विचारही करु शकत नाही. अशा वेळेत तयार होणाऱ्या नवीन स्वरुपाच्या नोकऱ्यांसाठी आपण आपल्या लोकांना कसे तयार करणार आहोत? त्यासाठी आपल्याला नवीन अभ्यासक्रमांची गरज लागणार आहे. आपले आयआयटी, अभियांत्रिकी आणि इतर शैक्षणिक संघटनांचे अभ्यासक्रम देखील कालबाह्य ठरतील, अशी भिती अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. ‘कोविड-१९ आणि कामाचे भविष्य’ या विषयावर आधारीत एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. या कॉन्फरन्सला जागतिक बॅंकेचे भारताचे संचालक जुनैद अहेमद, हिरो एन्टरप्राईजेसचे अध्यक्ष सुनिल मुंजाळ, नॅसकॉमच्या अध्यक्षा देबजानी घोष, टिमलिजचे अध्यक्ष मनिष सभरवाल आणि अर्बन कंपनीचे सहसंस्थापक अभिराज भाल उपस्थिती होते. 

जागतिक बॅंकेचे संचालक जुनैद अहेमद म्हणाले, आपल्या काम करण्याच्या पध्दतीतच मुलभूत बदल होणार आहेत. ‘बदलांना यापूर्वीच सुरुवात झाली होती आणि वातावरणातील बदल आणि त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर दिवसेंदीवर होत जाणारा परिणामांमधुन बदलांची नांदी व्हायला सुरुवात झाली होतीच. एका दशकापूर्वी असे वाटत होते की वातावरणातील बदलांच्या परिणामांमुळे विकसनशील देशांना या बदलांसोबत जाणे कठीण होईल. पण भारताने अक्षय ऊर्जेची निर्मिती आणि ऊर्जानिर्मितीच्या प्रयोगांसाठी  प्रचंड मोठ्या प्रमाणात स्त्रोत वापरले. कोविड-१९ मुळे जगाला आणखी एक धक्का बसलाय आणि या धक्क्यामुळे आपल्याला आता बदलांच्या वाटेवर आणून ठेवले आहे. त्यामुळे आता जग मागे जाणार नाही तर नवीन आव्हानांचा सामना करीत नव्या सत्याचा सामना करणार आहे.’ असे अहेमद यांनी यावेळी बोलताना सांगितले. ते म्हणाले, या परिस्थितीशी सामना करताना मला एक खुप वेगळ्या प्रकारची सामाजिक सुरक्षा तसेच वेगळ्या प्रकारची आरोग्य यंत्रणा दिसते. यासोबतच एका वेगळ्या प्रकारची अनौपचारिक अर्थव्यवस्था तयार होताना दिसते आहे, जी आताच नवीनतः सर्वसामान्य (न्यू नॉर्मल) वाटायला लागली आहे. 

घोष म्हणाल्या, या महामारीच्या निमित्ताने मुलभूत बदल घडवत व्यवसायांचे पुनःनिर्माण करण्याची गरज आहे. मुलभूत बदल करण्यासाठी जर आता आपण ही संधी घेतली नाही तर तो आपला तोटा असेल. आपण पूर्णपणे उद्योगांचे पुनःनिर्माण करायला पाहिजे. त्या म्हणाल्या आपण एकदम १०० टक्के उत्पादकतेवर येण्याची गरज नाही. सुरुवाती सुरुवातीला ती अगदी २५ टक्के सुद्धा असू शकते. टिसीएस ने तर २५/२५ हा नवीन फॉर्म्युला देत एक नवीनच ध्येयच सर्वांसमोर ठेवले आहे. याचा अर्थ २०२५ पर्यंत त्यांचे फक्त २५ टक्के लोक कार्यलयात येऊन काम करतील आणि उर्वरित सर्व कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणारे असतील. ऑनलाईन  आणि ऑफलाईन असे एक वेगळ्याच प्रकारचे मिश्र मॉडेल आपल्याला यापुढच्या काळात पहायला मिळणार आहे, जे बराच काळ अस्तित्वात असेल. त्यामुळे बरेच बदल देखील पहायला मिळतील, त्यातला बदल म्हणजे कामाच्या जागा बदलतील म्हणजे आपण त्याकडे कसे बघतो आणि त्यांची रचना कशी करतो त्यावर ते अवलंबून असेल. यामुळे हलत्या डोलत्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची देखील शक्यता आहे. कारण जेव्हा तुम्ही घरुन काम करत असाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला आणखीही काही गोष्टी करण्याच्या संधी आहेत. 

सुनिल मंजुळ म्हणाले, माणसाची वागण्याची पध्दत कदाचित बदलणार नाही; मात्र माणसांची कामं आणि कामांच्या पध्दतीत मात्र बदल होणार, ही गोष्ट निश्चित आहे. सामाजिक आरोग्यावरचे प्रयत्न आणि प्रतिरोधक आरोग्याच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होतील. हे बदल करताना खुप काही नवीन शिकण्याची मात्र सर्वांना तयारी ठेवावी लागेल. 

special report after corona current education system will be out dated see what niti aayog has to say

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com