Special Report: कोण आहे दिलीप छाबरिया?

Special Report: कोण आहे दिलीप छाबरिया?

मुंबईः प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया याला गुन्हे शाखेने कार नोंदणीकरण गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. त्यात क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांचीही छाबरियाने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले. त्या अनुषंगाने या प्रकरणाचा घेतलेला आढावा.

कोण आहे दिलीप छाबरिया?

दिलीप छाबरिया देशातील प्रसिद्ध कार डिझायनर आहेत. डीसी नावाने त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला असून त्यांनी मॉड्युफाईड केलेल्या प्रत्येक गाडीवर हा ब्रँड असतो. अनेक सेलेब्रिटी त्यांचे ग्राहक आहेत. त्यांची दिलीप छाबरिया डिझाईन्स कंपनी 1993 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी डीसी अवंतीची स्थापना केली. त्या अंतर्गत देशातील पहिली स्फोर्ट्स कारची निर्मिती करण्यात आली.

काय आहे प्रकरण, कशी झाली अटक?

डीसी डिझाइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया यांना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता (सीआययू) पथकाने अटक केली होती. नरिमन पॉईंट परिसरात एक बनावट नंबर प्लेट असलेली स्पोर्टस कार येणार आहे. त्यानुसार, सचिन वझे यांनी सापळा लावला होता. मात्र या ठिकाणी संबधित स्पोर्टस कार आली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल ताज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वझे यांच्या पथकाने या ठिकाणी पुन्हा सापळा लावला. अशातच एक स्पोर्टस कार या ठिकाणी दाखल झाली. यादरम्यान, पोलिसांनी याची झडती घेतली असता, या कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याचा चेसी नंबर देखील बदलल्याचे पोलिसांना आढळले.

त्यानुसार, पोलिसांनी ही कार ताब्यात घेत, ती बनविणा-या दिलीप छाबारियाला अटक केली. ही कार चेन्नई येथे रजिस्टर असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
यापूर्वी क्रिकेटर दिनेश कार्तिकचीही फसवणूक

क्रिकेटर दिनेश कार्तिक याने या कंपनीचा मालक छाबरिया विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्याने दिनेश कार्तिकला कार देतो असे सांगत 5 लाख रुपये अॅडव्हान्स घेतल्याचे देखील समोर आले होते. तससेच छाबरिया याने त्याच्या कंपनीच्या माध्यमातून 120 स्पोर्टस कार देश परदेशात विकल्या असून यातील सरासरी एका कारवर 42 लाख एवढे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तर यातील 90 कारमध्ये आर्थिक घोटाळा असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कॉमेडियन कपिल शर्माचीही साडे पाच कोटींची फसवणूक

प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया याने कॉमेडियन कपील शर्मालाचीही साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कपिल शर्माचा जबाब नोंदवण्यात आला. कपिल शर्माने छाबरियाला महागडी व्हॅनिटी व्हॅन बनवण्यास सांगितले होते. त्याचे सर्व पैसे शर्माने दिले होते. पण त्याबदल्यात त्याला व्हॅन मिळालीच नाही. याप्रकरणी गेल्यावर्षी कपिल शर्माने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. नुकतीच कार नोंदणीप्रकरणी दिलीप छाबरियाला अटक झाल्यानंतर त्याबाबतच्या बातम्या पाहून कपिल शर्मा यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांना संपर्क साधला. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी त्याचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करून पोलिस छाबरियाचा शुक्रवारी याप्रकरणी ताबा घेण्याची शक्यता आहे.

2017 मध्ये कपिल शर्माने छाबरियाला पाच कोटी रुपये दिले होते. त्यानंतर 2018 जीएसटीच्या बहाण्याने आणखी 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतरही शर्माचा कार मिळाली नाही. त्यावेळी छाबरियाने 60 लाख रोख रकमेची मागणी केली. कार मिळाली नसल्यामुळे, कपीलने कपिल रक्कम दिली नाही. त्यानंतर व्हॅन तयार नसतानाही एवढे दिवस गॅरेजमध्ये पडून असल्याचे सांगून पार्किंग चार्जेसच्या नावाखाने छाबरियाने  13 लाख रुपयांचे बिल कपीलला पाठवले. पैसे घेऊनही व्हॅन न मिळाल्याने अखेर कपील शर्माने याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Special Report Who is Dilip Chhabria

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com