ब्रह्मानंद प्रतिष्ठानची बहिणींसाठी विशेष राखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नवी मुंबई : रक्षाबंधन हा खरं तर भावाने बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देण्याचा सण; परंतु भावाइतकीच बहीणदेखील आपल्या भावंडांची काळजी घेते, त्यांचं रक्षण करते. मोठी ताई किंवा फक्त मुली असलेल्या घरांमध्येही बहिणी या एकमेकींच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभ्या असतात आणि अशा बहिणींचा सन्मान करण्यासाठी बेलापूर येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी खास बहिणीसाठी विशेष राखी बनवली आहे. 

मोती, डायमंड लावून बनवलेली ही ब्रेसलेट राखी सर्वांच्या कौतुकाचा विषय बनली आहे. बहिणींसोबतच अनेक भाऊदेखील आपल्या ताईसाठी या राख्यांना पसंती देत आहेत. अशा प्रकारच्या प्रयोगातून विद्यार्थी व समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता रुजवण्याचा संस्थेचा मानस आहे. या राखीसोबतच रुद्राक्ष राखी, पारंपरिक गोंडा राखी, डायमंड व मोत्यांच्या राख्या, कार्टुनच्या राख्या अशा विविध प्रकारच्या राख्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आहेत. १० रु. ते १०० रु. पर्यंत किंमत असलेल्या या राख्यांना ऑनलाईनही मागणी मिळत असून, यातील काही राख्या सिंगापूरला देखील पोहोचल्या आहेत. या राख्यांची संकल्पना स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या फाल्गुनी व्होकेशनल युनिटच्या आदिती कदम, निशिगंधा सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांची आहे.

प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध होत आहे. याशिवाय सामाजिक संदेश पोहोचण्यासही मदत होत असल्याचा आनंद आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून १४ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठानचे विद्यार्थी अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधणार आहेत. 
- छाया सावंत, स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special reservation for the sisters of Brahmanand Pratishthan