Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करा खर्च!

सदस्यांच्या संख्येनुसार मर्यादा निश्‍चित
Spending for Gram Panchayat Election Limit fixed by number of members State Election Commission mumbai
Spending for Gram Panchayat Election Limit fixed by number of members State Election Commission mumbaiEsakal

मुंबई : ग्राम पंचायत निवडणुकांसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाच्या मर्यादेत राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा केली असून, यापूर्वी असलेली सरसकट २५ हजार रुपये खर्चाची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठीही खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सदस्य आणि सरपंच ही पदे सर्व प्रभागांकरीता सामायिक असून प्रत्येक प्रभागातून या सामाईक पदासाठी मतदान होणार आहे. याचा विचार करता सरपंचपदाच्या उमेदवारास ग्रामपंचायतींच्या सर्व प्रभागांमध्ये प्रचारासाठी संपर्क करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभाग संख्येच्या प्रमाणात सरपंचपदाच्या उमेदवाराची निवडणूक खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांमधून सरपंचांची निवड पहिल्यांदाच होत असल्याने या खर्चाची मर्यादाही प्रथमच निश्चित करण्यात आली आहे.

आतापर्यंत निवडणुकीमध्ये करावयाची खर्चाची मर्यादा सर्व ग्रामपंचायतीसाठी सरसकट पंचवीस हजार रुपये एवढी होती. त्यात आता सुधारणा करून ग्रामपंचायत सदस्यांच्या संख्येवर ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्यनिहाय खर्चाची मर्यादा (रुपयांमध्ये)

७ ते ९ : २५,०००

११ते १३ : ३५,०००

१५ ते १७ : ५०,०००

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी

७ते ९ : ५०,०००

११ते १३ : १,००,०००

१५ ते १७ : १,७५,०००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com