499 रुपयांमध्ये कोरोना चाचणी; अहवाल 24 तासात; मुंबईत अतिरिक्त 3 हजार कोरोना चाचण्या करता येणार

499 रुपयांमध्ये कोरोना चाचणी; अहवाल 24 तासात; मुंबईत अतिरिक्त 3 हजार कोरोना चाचण्या करता येणार

मुंबई, ता 11 : आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण पार पडलं. भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध  करून देण्यात येईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त 3 हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल 24 तासात मिळेल आणि फक्त 499 रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल अशी माहिती आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी दिली.

गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात  या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे.गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेंव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा येथे दोन ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या ५०० वर नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशियातांची तपासणी करतांना सहव्याधीग्रस्तांचा शोध ही घेण्यात आला.

कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येतांना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु आहे. त्यामुळे आज ही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे  प्राधान्य आहे. अशा गरजेच्यावेळी स्पाईस हेल्थ ने पुढे येऊन परवडणाऱ्या दरात कोराना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, कमी वेळेत त्या चाचणीचा अहवाल ही मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होईल. मुंबईत या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचा मोठा ड्राईव्ह हातात घेता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांचा शोध घेणे त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणी करून घेणे याला आजही खुप महत्व आहे. त्यानंतच उपचार, क्वारंटाईन करणे शक्य आहे. अशा महत्वाच्यावेळी सामाजिक दायित्वातून स्पाईस हेल्थने ही सुविधा  उपलब्ध केल्याचा उल्लेख ही त्यांनी आवर्जुन केला.

मुंबईकरांच्या वतीने स्पाईस हेल्थला धन्यवाद देतांना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कमी वेळेत कोरोनाचा रिपोर्ट देणारी आणि कमी दरात चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणारी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमात स्पाईस हेल्थचे अ‍जय सिंह यांनीही सुविधा सुरु करण्यामागची भुमिका सांगतांना व्हॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे भविष्यात एचआयव्हीसह इतर आजारांच्या चाचण्याही करता येतील अशी माहिती दिली.

एनएबीएल ॲक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, स्पाईस जेटचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संजय जयस्वाल, स्पाईस हेल्थचे जुबेर खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

spice health mobile vans will run in mumbai to enable 3 thousand extra testing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com