

मुंबई: ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला काही गैरहजर राहिले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना (यूबीटी) पुन्हा फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेचे (यूबीटी) काही खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.