Corona : कोणाशी संपर्कच नको म्हणून नागरिकांनी लढवली अशी शक्कल..., वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

नवी मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून, जवळपास कोरोनाबाधितांचा आकडा 300 च्या जवळपास गेला आहे.

वाशी : नवी मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून, जवळपास कोरोनाबाधितांचा आकडा 300 च्या जवळपास गेला आहे. काही वस्त्यांमध्ये स्वयंस्फूर्तीने लोकांनी आता कठडे उभारणी सुरू केली आहे. यात परिसरातील नागरिकांनी सुरक्षेसाठी लोखंडी पत्रे लावले आहेत. काही ठिकाणी बांबूचे कठडे लावण्यात आले आहे. 

नक्की वाचा  : लॉकडाऊन : गावी पाठवण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसर असणारे तुर्भे, इलठण पाडा, यादवनगर, बिदूमाधव नगर, रबाले, विष्णुनगर या परिसरात काही लोकांनी कठडे उभारले आहे. चाळीमध्ये नागरिकांनी परवानगी नाकरत असल्यामुळे अनेक ठिकाणी वाद होण्याचे प्रकार घडले. तरीही लोकांनी स्वत:हून परिसर बंद करण्याचा निर्णय घेतला.

 नक्की वाचा : कोरोना योद्धांना भारतीय हवाई दलाकडून अनोखी मानवंदना

गल्लीबोळांमध्ये व सोसायटी असलेल्या परिसरात दहा ते बारा घरे असलेल्या ठिकाणी लोकांनी स्वत:हून लाकडी कठडे लावून मार्ग बंद करीत आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांची अडचण होत आहे.

Spontaneous blockade of citizens in Navi Mumbai out of fear


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneous blockade of citizens in Navi Mumbai out of fear