दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना रेल्वेकडून मोठा दिलासा; दहा डिसेंबरपर्यंत करता येणार लोकल प्रवास

प्रशांत कांबळे
Saturday, 21 November 2020

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेशन देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थांबरोबर पालकांना सुद्धा प्रवेश देण्यात येणार आहे.

मुंबई : दहावी-बारावीच्या परिक्षेत अपेक्षित यश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षांकरिता 10 डिसेंबरपर्यंत उपनगरीय लोकलमधून विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शुक्रवारपासून सुरू झालेली आहे. मात्र मुंबई उपनगरात परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे आणि परीक्षा केंद्रावर वेळेवर करिता विद्यार्थी आणि पालकांकडून उपनगरीय लोकल सेवेत प्रवेश देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. यासबंधीत राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी लोकल सेवेत प्रवेश देण्याची मागणी रेल्वेकडे केली होती. 

या मागणीला प्रतिसाद देत मध्य आणि पश्चिम रेल्वेने येत्या 10 डिसेंबरपर्यंत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवस करण्याची मुभा देण्यात आली आहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेशन देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थांबरोबर पालकांना सुद्धा प्रवेश देण्यात येणार आहे.

याही बातम्या वाचा : 

>> ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय

>> कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत; मुंबई दिल्ली मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा बंद ?

>> पवारसाहेब, "मराठा स्त्रीला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायची भूमिका तुम्ही घेतली तर त्याला समर्थन"

>> भाजपने आतापासूनच उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला!

>> 26/11 दहशतवादी हल्ला : पोलिस आयुक्तालयात उभे राहतेय भव्य शहीद स्मारक

 

SSC and HSC repeaters can travel from the local train for their exams


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC and HSC repeaters can travel from the local train for their exams