आणखी एका शिक्षकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई - दहावी पेपरफुटी प्रकरणात आणखी एका शिक्षकाला अंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. प्रशांत परशुराम धोत्रे असे त्याचे नाव असून तो मुंब्रा परिसरातील रहिवासी आहे. उद्या (ता. 3) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

अंधेरी येथील एका शाळेत 19 मार्चला दहावीचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दया नायक यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान तीन शिक्षकांना नागपाडा आणि अंबरनाथ परिसरातून अटक करण्यात आली. त्या तिघांच्या चौकशीत बदलापूर येथील शिक्षकाचे नाव समोर आले. तो शिक्षक पेपरपूर्वी विद्यार्थ्यांची उजळणी करून घेत होता. पेपरफुटी प्रकरणी आठ विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली होती. मुंब्रा येथील शाळेच्या प्राध्यापकाची चौकशीही करण्यात आली. दया नायक यांच्या पथकाने सोमवारी (ता. 2) धोत्रेला अटक केली. परीक्षा केंद्रात तो पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडायचा. त्याच्या मोबाईलवर पेपर यायचे. त्यानंतर तो सोशल मीडियाद्वारे पेपर फोडायचा, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पेपरफुटीच्या घटनेनंतर पोलिस धोत्रेच्या शोधात होते. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या चार झाली आहे. 

Web Title: ssc exam paper leake teacher arrested