पेपरफुटीप्रकरणी क्‍लासचालक अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - दहावी पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. मुनीर मुस्ताक शेख असे त्याचे नाव आहे. अंबरनाथ परिसरात तो खासगी क्‍लास चालवतो. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या क्‍लासमधील 40 विद्यार्थ्यांची पोलिस चौकशी करणार आहेत. 

मार्चमध्ये दहावीचा पेपर फुटला होता. पेपरफुटीप्रकरणी अंबोली पोलिस त्याचा तपास करत आहेत. उपनिरीक्षक दया नायक यांच्या पथकाने तपास करून फिरोज खानला अटक केली होती. त्याच्या चौकशीत काहींची नावे उघड झाली होती. गुरुवारी (ता. 5) प्रशांत परशुराम धोत्रेला अंबोली पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत मुनीरचे नाव समोर आले होते. 

Web Title: ssc papper leake case classowner arrested

टॅग्स