esakal | आयुष्याची परीक्षा देता देता अमृता देतेय दहावीची परीक्षा; अमृता तुला सलाम !
sakal

बोलून बातमी शोधा

आयुष्याची परीक्षा देता देता अमृता देतेय दहावीची परीक्षा; अमृता तुला सलाम !

आयुष्याची परीक्षा देता देता अमृता देतेय दहावीची परीक्षा; अमृता तुला सलाम !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : बोर्डाची परीक्षा म्हटली, की विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही परीक्षेचा ताण येतो, पण काही विद्यार्थी केवळ या परीक्षेशीच नाही, तर आजारांशीही लढत असतात. कुर्ल्याच्या डोंगर चाळ येथे राहणारी अमृता कालुष्टे अशीच जिद्दी विद्यार्थिनी कर्करोगाशी लढा देत दहावी परीक्षेला सामोरी जात आहे. 

मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

अमृता ही सायन येथील डी. एस. हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिला हाडांचा कर्करोग असून 2017 पासून ती नियमितपणे केमोथेरपी घेत आहे. बॉम्बे हास्पिटलमध्ये तिच्यावर उपचार असून गेल्याच महिन्यात तिच्यावर एक लहानशी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. असे असतानाही जिद्दी स्वभावाची अमृता रायटरची (लेखन मदतनीस) मदत घेऊन दहावीची परीक्षा देत आहे. परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी मी सलग जास्त वेळ बसू शकत नाही, पण मला परीक्षा बुडवायची नव्हती. आजारपणामुळे दहावीच्या वर्षात मला नियमितपणे शाळेत जाता आले नाही, पण शाळेतील शिक्षक आणि मैत्रिणींच्या सहकार्याने मी अभ्यास केला, असे अमृता कालुष्टे हीने सांगितले. 

मोठी बातमी - संजय राऊत यांचं 'चक्रावून' टाकणारं ट्विट, राऊत म्हणतात...

अमृताला हाडांचा कर्करोग असल्यामुळे तिला जास्त वेळ बसता येत नाही. अमृताच्या वडिलांनी तिला रायटर (लेखन मदतनीस) मिळावा अशी विनंती शाळेला केली होती. शाळेने परीक्षा मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर ती रायटरच्या साह्याने दहावी परीक्षा देत आहे. या परीक्षेत ती नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी आम्हा सर्वांना खात्री असल्याचे, शाळेचे मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांनी सांगितले

ssc student amrura dealing with cancer giving exams