esakal | मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ST बसचा भीषण अपघात, १५ जण गंभीर जखमी

बोलून बातमी शोधा

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ST बसचा भीषण अपघात, १५ जण गंभीर जखमी

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पनवेलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पनवेलपासून 9 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली आहे.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ST बसचा भीषण अपघात, १५ जण गंभीर जखमी
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पनवेलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पनवेलपासून 9 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे एसटी बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.   सातारा (कलेढोन) येथून मुंबई (परळ) येथे जात असलेल्या एसटी बस (क्रमांक एमएच १४- बीटी ४६९७) याला अनोळखी कंटेनरने उजव्या बाजूने मागून धडक दिली. या अपघातात चालकासह १५ जण जखमी झालेत. 

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बसला अज्ञात वाहनाची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की एसटी बसचा उजव्या बाजूकडील पत्रा कापत जबर धडक बसली होती. उजव्या बाजूकडील आसनावर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले.  या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी गंभीर जखमी आहेत.

अधिक वाचा-  मास्टर ब्लास्टर सचिन जेव्हा मुंबईतला रस्ता विसरतो, तेव्हा रिक्षाचालक म्हणतो 'मला फॉलो करा'

महामार्ग पोलिस देवदूत यंत्रणा लोकमान्य रुग्णालय रुग्णवाहिका यांनी वेळीच मदत कार्य करत तातडीने सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. प्रवाशांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महामार्ग वाहतूक पोलिस संबंधित कंटेनरचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

St bus accident mumbai pune express panvel highway one died 15 people injured