
मुंबईः एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी मिळाली. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास करण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे प्रवासी चांगलेच सुखावले आहेत. दरम्यान एसटी पहिला दिवस काहीसा नियोजनाच्या अभावामुळे गोंधळाचा गेला. आता कोणत्याही पासशिवाय प्रवास शक्य आहे. प्रवास सुरु झाला असला तरी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर विलगीकरणाच्या नियमात मात्र स्पष्टता नसल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण कायम आहे. तसंच पुरेशा तयारीविना सेवा सुरु करण्याची घोषणा झाल्याने वेळापत्रक तयार करताना कर्मचारी, अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
कोरोनाची चाचणी बंधनकारक नसल्याचं स्पष्ट करुनही कोकण प्रवासासाठी २१ ऑगस्टपर्यंत चाचणी बंधनकारक असल्याचं प्रवाशांना काही आगार, बस स्थानकात सांगितलं जात होतं. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमही निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी थेट प्रवास करण्यापूर्वी चौकशीकरून एसटी प्रवास करण्याला पसंती दिली. यामुळे पहिल्या दिवशी प्रवाशांचा एसटी सेवेला कमी प्रतिसाद मिळाला. त्यातच कमी गाडया, मनुष्यबळ, ऑनलाईन बुकिंग, विस्कळीत वेळापत्रकाचा काही प्रमाणात प्रवाशांना फटका बसला.
विलगीकरण करणार का?, घरी जायला देणार का? की संस्थात्मक विलगीकरण करणार? असे प्रश्न मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर स्थानकावरील प्रवाशांनी एसटी अधिकाऱ्यांना विचारले. या नियमांबाबत स्पष्टता नसल्यानं एसटी अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमता दिसली.
गेले काही दिवस गाड्या बंद असल्यानं त्यांची तांत्रिक कामं पूर्ण होणं आवश्यक आहे. कोरोनाच्या धास्तीनं मुंबई, ठाणे, पालघरमधील काही कर्मचारी अद्यापही गैरहजरच आहेत. परिणामी गाडया आणि मनुष्यबळ पुरेसं नसल्यानं काही विभागातून खूपच कमी गाडया सुटल्याचं सूत्रांनी सांगितले. दादर-पुणे मार्गावरील एसटीची प्रतिष्ठित शिवनेरी बस २० प्रवाशांसह सकाळी ८ वाजता निघाली.
मुंबई, ठाणे आणि पालघर येथून एकूण २५ एसटी शुक्रवारी रवाना करण्यात आल्या. आंतरजिल्हा वाहतुकी अंतर्गत महामंडळाने गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत ७२१ बसच्या एकूण ८०० फेऱ्या केल्या. तर दुपारी ४ पर्यंत राज्यभरात ८४० बसेसद्वारे १ हजार ९० फे ऱ्या पूर्ण केल्या होत्या. मुंबई, ठाण्यातून दिवसभरात ५ शिवनेरी बस पुण्याकडे रवाना झाल्या. त्यातून सुमारे १०० प्रवाशांनी प्रवास केला. उपलब्ध नसलेल्या गाडय़ा आणि प्रवासीही नसल्यानं मुंबई, ठाण्यातून शिवनेरी गाडया एक ते तीन तासांच्या अंतरानेच सोडण्यात आल्या. पुण्यातून मुंबईत केवळ एकच शिवनेरी दाखल झाली. त्यामध्ये १८ प्रवासी होते.
दरम्यान पहिल्या दिवशी प्रतिसाद कमी लाभल्याने मागणीनुसार गाड्या चालवण्याचे आदेश राज्यातील सर्व विभागांना देण्यात आले आहेत, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
St bus service inter district resumes passengers facing the problem on first day
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.