Pratap Sarnaik: रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधू कडून एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Rakshabandhan 2025: रक्षाबंधनच्या चार दिवसांत एसटी महामंडळाला तब्बल १३७ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. ११ ऑगस्टला एका दिवसात ३९ कोटींचे विक्रमी उत्पन्न मिळाले.
मुंबई : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे.