मुंबई : एसटी महामंडळाला सुमारे १० हजार कोटी संचित तोटा आहे. त्याचवेळी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेपैकी एक हजार कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकारने दिली नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळण्यासाठी व इतर आर्थिक कामकाजासंदर्भातील एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सोमवारी (ता.२३) जाहीर करण्यात येणार आहे.