ST Bus: दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून २५० जादा फेऱ्यांचे नियोजन
Special ST Bus For Diwali: दिवाळी सणानिमित्त प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. मुंबईतून २५० हून अधिक फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
मुंबई : दिवाळी सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने मुंबई विभागातील आगारातून दररोज सुमारे १४ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान २५० हून अधिक फेऱ्या केल्या जाणार आहेत.