MSRTC
MSRTC

कामचुकार कंपनीवर कृपादृष्टी का?

मुंबई - एसटी महामंडळातील ‘एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग’ (ईआरपी) प्रकल्प राबविण्यासाठी रोल्टा इंडिया कंपनीला २०१७ मध्ये कंत्राट देण्यात आले. हा प्रकल्प राबविण्यासाठी एक वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला; परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाची या कंपनीवर एवढी कृपादृष्टी का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

एसटी महामंडळातील कार्यालयीन कामकाज संगणकीकृत करण्यासाठी ‘ईआरपी’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पुरवठा, डिझाईन, अंमलबजावणी, देखभाल आदी घटकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांतर्गत लेखा, भांडार, खरेदी, वाहतूक, यंत्र, अभियांत्रिकी, विधी, कर्मचारी आदी विभागांचे संगणकीकरण होणार आहे. परंतु, रोल्टा इंडिया कंपनीने अद्याप काम सुरूच केलेले नाही. कार्यादेशाला एक वर्ष उलटल्यावरही काम सुरू झालेले नाही. हा प्रकल्प ठप्प झाला असूनही एसटी प्रशासनाने कंपनीवर कारवाई का केली नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

‘ईआरपी’ प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल. विलंब होत असल्यास कारवाई करण्याबाबत विचार केला जाईल. 
- रणजितसिंह देओल, संचालक, एसटी महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com