एसटी कामगारांच्या डबल ड्युटीला चाप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - एसटी चालक-वाहकांच्या डबल ड्युटीला महामंडळाने परिपत्रक काढत चाप लावला आहे. राज्यभरातील सर्व आगारप्रमुखांना डबल ड्युटीचा नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले गेले असून कमी वेतनश्रेणीच्या चालक-वाहकांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

एसटी आगारातील पर्यवेक्षक व चालक-वाहकांदरम्यान डबल ड्युटीपोटी मिळणाऱ्या जादा भत्त्यासाठी चाललेल्या संगनमतावर महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने करडी नजर फिरवली आहे. जादा वेतनश्रेणी असलेल्या चालक-वाहकांनाच डबल ड्युटी मिळण्यासाठी परिस्थिती निर्माण केली जात असल्याने विभागाने परिपत्रक काढत आगारप्रमुखांना नियमावली आखून दिली आहे. डबल ड्युटीचे वेळापत्रक बनवताना कमी वेतनश्रेणीच्या चालक-वाहकांना प्राधान्य द्या असे स्पष्ट केले पाहिजे. महामंडळांची आर्थिक स्थिती व एसटीचे अपघात रोखण्यासाठी चालक-वाहकाला विश्रांती दिली गेली पाहिजे. आठवड्यात सहा दिवस काम केले तर एक दिवस पूर्ण विश्रांती दिलीच गेली पाहिजे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: st employee double duty

टॅग्स