'एसटी' कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नुकत्याच पुकारलेल्या संपादरम्यान खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभागी झालेल्या कोल्हापूर आगारातील वाहकाला महामंडळाने निलंबित केले आहे. आप्पासाहेब साळोखे असे या वाहकाचे नाव आहे. एसटी महामंडळाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय प्रसिद्धीमाध्यमांशी बोलण्यास मनाई आहे. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या नियमाबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगत आपल्याला माफ करण्याची विनंती साळोखे यांनी निवेदनाद्वारे कोल्हापूरच्या आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करत आगार व्यवस्थापकांनी साळोखे यांचे निलंबन मागे घेण्याची कार्यवाही सुरू केल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
Web Title: ST employee Suspend