
सगळे पर्याय संपले... एसटीचे ४३ हजार कर्मचारी कामावर रुजू
मुंबई: उच्च न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. (ST Workers Strike)
त्यामुळे समोर कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने एसटी कर्मचारी कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४३ हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे एसटी सेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एसटीच्या विलीनीकरणासाठी ३ नोव्हेंबरपासून सुरू झालेला एसटीचा संप संपता संपत नव्हता.
विलीनीकरणाशिवाय माघार नाही म्हणणारे एसटी कर्मचारी आता सदावर्तेंच्या अटकेनंतर आपापली नोकरी वाचवण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाने २२ एप्रिलपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची मुभा दिली आहे. शुक्रवारी १५०० पेक्षा जास्त एसटी कर्मचारी कामावर हजर झाले. एसटीच्या १६ हजार ६९७ दैनंदिन फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
Web Title: St Employees Start Work
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..