घोषीत केलेल्या वेतनवाढीसाठी कामगार संघटना मातोश्रीवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई : घोषीत केलेली वेतनवाढ मिळावी म्हणून कामगार संघटनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर धाव घेतला आहे. वेतन वाढीचा तिढा सोडवण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी लक्ष घालण्याची मागणी मान्यता प्राप्त संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केली आहे.

एसटी कामगारांच्या वेतनप्रश्नी आज मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्यावतीने जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे  व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीबाबत माहिती देताना संदिप शिंदे म्हणाले, "सेवामुक्त केलेल्या 1010 कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करून त्यांची सेवाजेष्ठता कायम ठेवण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेल्या रू 4849 कोटी रूपयामध्ये संघटनेला आपल्या सुत्राप्रमाने वाटप करण्याबाबत चर्चा करण्यात आली. एक दिवसाला आठ दिवसाची वेतनकपात राहिलेल्या कामगारांचे निलंबन इ विषयावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चा करून शिवसेना प्रमुखांनी मदतीचे आश्वासन दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: st employees union on matoshree meets uddhav thackeray