एसटीच्या आंतरराज्य प्रवासाला ‘ब्रेक’

ST Bus
ST Bus

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आंतरराज्य बस फेऱ्या बंद केल्या आहेत. महाराष्ट्राच्या एसटीचे प्रवासभाडे जास्त असल्यामुळे इतर राज्यांच्या परिवहन सेवेला प्रवाशांची अधिक पसंती असल्याचे दिसते, त्यामुळे एसटी बसच्या आंतरराज्य प्रवासाला ब्रेक लागला आहे. 

महाराष्ट्रात दररोज ७० लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देणारी एसटी शेजारील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील प्रवाशांनाही सेवा देते. अन्य राज्यांची परिवहन महामंडळे टप्पा दर व प्रवासी करारानुसार आंतरराज्य मार्गांवर तिकीट आकारतात. त्यामुळे अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाचा टप्पा दर आणि प्रवासी करही १७.५ टक्‍क्‍यांनी जास्त असल्यामुळे एसटीचा आंतरराज्य प्रवास कमी झाला आहे.

सध्या ११३७ आंतरराज्य मार्गांवर २५४८ फेऱ्या मंजूर असूनही, एसटी महामंडळातर्फे केवळ ५७९ आंतरराज्य मार्गांवरील १७०८ फेऱ्या चालवल्या जातात. इतर राज्यांनी मात्र मंजूर असलेल्या मार्गांवर १०० टक्के फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ तर शिर्डी, नाशिक, मुंबई, पुणे यांना जोडणाऱ्या मार्गांवर मंजुरीपेक्षा जास्त फेऱ्या कमी दरांत चालवत आहे. परिणामी महाराष्ट्राच्या एसटीचे हक्काचे प्रवासी कमी होत असल्याचे सांगण्यात येते. ही परिस्थिती मुंबई- हैदराबाद, मुंबई- हुबळी, मुंबई- बंगळूर, मुंबई- पणजी अशा अनेक आंतरराज्य मार्गांवर दिसून येते.

ज्या राज्यांत एसटी बस चालवायची असते, तेथील प्रवास भाड्यापेक्षा जास्त तिकीट आकारता येत नाही. त्यामुळे कोणत्या मार्गांवर जादा भाडे आकारले जाते, याची माहिती घ्यावी लागेल. आंतरराज्य फेऱ्यांत मागणीप्रमाणे वाढ केली जाते.
- रणजितसिंह देओल, संचालक, एसटी महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com