कोकणातील एसटीचे आरक्षणच बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

कल्याण - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता मुंबईतील चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. या उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र, विठ्ठलवाडी आगारात पाच दिवसांत आरक्षण बंदच असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या विषयात लक्ष घालावे, असे आवाहन कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी केले आहे. 

ठाणे विभागात 2015 या वर्षी 138 जादा गाड्यांचे आरक्षण झाले होते. या वर्षी ही संख्या 150 वर जाण्याची शक्‍यता होती. कल्याण आगारातील 34 नियमित गाड्यांशिवाय 20 अधिक गाड्या दिल्या आहेत. मात्र, कल्याणला सहा जादा गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने अधिक गाड्या मागवण्यात येणार आहेत. विठ्ठलवाडी आगारात 77 गाड्या खुल्या आरक्षणासाठी; तर 35 गाड्या समूह आरक्षणासाठी दिल्या होत्या. हे आरक्षण खुले झाल्यानंतर पाचच दिवसांत 99 गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले. 13 बसचा कोटा शिल्लक असतानाही आरक्षण खिडकी बंद झाल्याने कोकणवासीयांची गैरसोय होत आहे. एसटीचे तिकीट उपलब्ध होत नसल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खासगी बसचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. खासगी बसचे भाडे दीड पट असल्याने कोकणवासीयांची गैरसोय होत असल्याची तक्रार शिर्के यांनी केली आहे. या प्रकरणी परिवहनमंत्री रावते यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: ST Konkan off the reservation