एसटीलाही पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

मुंबई - तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोरदार तडाखा एसटी महामंडळाला बसला. अतिवृष्टीमुळे मुंबई विभागातील एसटीच्या एक हजार १७४ फेऱ्या रद्द करव्या लागल्या. त्यामुळे महामंडळाचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले.

महामंडळाच्या मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरूनगर, पनवेल आणि उरण या पाच आगारांतून राज्यभरात एसटी बस सुटतात. पावसामुळे तीन दिवसांत या आगारांतून सुटणाऱ्या एक हजार १७४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मुंबई सेंट्रल आगारातून सर्वांत कमी १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सर्वाधिक ४०८ फेऱ्या पनवेल आगारातून रद्द करण्यात आल्या. 

मुंबईतून रद्द करण्यात आलेल्या फेऱ्या
 ७ जुलै - ३४७  ८ जुलै - ४३५   ९ जुलै - ३९२

Web Title: ST loss due to rain