ठरलं ! मालमत्ता तारण ठेऊन ST काढणार कर्ज, महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठरलं ! मालमत्ता तारण ठेऊन ST काढणार कर्ज, महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता

मंडळाने मालमत्ता तारण ठेऊन कर्ज काढण्याला मान्यता दिली आहे. त्यासाठी आता, राज्यभरातील कुठले डेपो, मालमत्ता तारण ठेवण्यात येणार अद्याप स्पष्ट झाले नाही.

ठरलं ! मालमत्ता तारण ठेऊन ST काढणार कर्ज, महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई, ता. 2: एसटीच्या 295 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडे एसटीची मालमत्ता तारण ठेऊन तब्बल दोन हजार कोटी रुपये कर्ज मिळवण्यासाठी सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान मंडळाने मालमत्ता तारण ठेऊन कर्ज काढण्याला मान्यता दिली आहे. त्यासाठी आता, राज्यभरातील कुठले डेपो, मालमत्ता तारण ठेवण्यात येणार अद्याप स्पष्ट झाले नाही.

महत्त्वाची बातमी : "एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही"

या विषयांना मिळाली मान्यता

  • स्टेट बँकेच्या कर्ज उभारणीबाबत मान्यता
  • एसटी महामंडळात होणारी निधी गुंतवणूक
  • अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीबाबत शासनाच्या सूचना
  • महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर उपयोग करून भाडेकराराचा कालावधी 30 वर्ष ऐवजी 45 वर्ष

महत्त्वाची बातमी : बांग्लादेशी घुसखोरांना एमआयएम आमदारांचे पाठबळ? भाजपकडून अटकेची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीचा आर्थिक तोटा प्रचंड वाढला आहे. उत्पन्न बुडाल्याने दिवाळीच्या तोंडावर गेल्या तीन महिन्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे. एसटीच्या सध्याच्या उत्पन्नात कर्मचाऱ्यांचे वेतन होणे शक्य नसल्याने, एसटीचे डेपो, मालमत्ता तारण ठेवण्याच्या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब विचाराधीन होते. दरम्यान आज एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मालमत्ता तारण करून कर्ज घेण्याला मान्यता देण्यात आली.

त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यातील प्रलंबित वेतन लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाची घोषणा सुद्धा लवकरच परिवहन करतील अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे.

( संपादन - सुमित बागुल )
ST to mortgage their properties decision taken in managing committee meeting

loading image
go to top