ST News: एसटीच्या 'आवडेल तेथे प्रवास' ने या योजनेला राज्यात पसंती ; मिळाले १४ कोटींचे उत्पन्न

दहा दिवस पास रद्द करून त्यात ४ दिवस आणि ७ दिवस या पासचा समावेश करण्यात आला | The 10-day pass was canceled and 4-day and 7-day passes were added
 ST News
ST Newsesakal

ST News: आवडेल तेथे प्रवास या योजनेला राज्यात पसंती मिळत आहे. या योजनेचा फायदा  गेल्यावर्षी लाखभर प्रवाशांनी घेतल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 राज्यभरात छोटे व्यापारी, उद्योजक, छोटे विक्रेते अशा अनेकांना कामांनिमित्त सलग काही दिवस एसटीचा प्रवास करावा लागतो.

 ST News
ST News| अटल सेतूवरून उद्यापासून धावणार ‘शिवनेरी’

अनेक हौशी पर्यटक आठवड्याची सुट्टी घेऊन मनसोक्त भ्रमंती करतात. अशा प्रवाशांसाठी असलेल्या ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. यंदाच्या नऊ महिन्यात तब्बल ८० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १९८८ मध्ये दहा दिवसांसाठी पास देत ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना सुरू केली. एप्रिल २००६ मध्ये योजनेची पुनर्रचना करत दहा दिवस पास रद्द करून त्यात ४ दिवस आणि ७ दिवस या पासचा समावेश करण्यात आला.

 ST News
ST Fire Accident : उमरगा आगारातील मुक्कामी एसटी बसला आग

शहर वाहतुकीसह राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीत एसटी ज्या ठिकाणी पोहोचते, अशा सर्व ठिकाणांपर्यंत या पासची वैधता आहे. पासधारकांना आरक्षण करून प्रवासाची मुभा आहे. यासाठी स्वतंत्र आरक्षण शुल्क भरावे लागते. पासधारकांमध्ये तीर्थक्षेत्रांसह, पर्यटन स्थळांकडे विशेष भर आहे.

जत्रा-यात्रा उत्सवांसह सलग सूट्ट्यांच्या काळात या पासची मागणी वाढत आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) एक लाख लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत महामंडळाला १४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 ST News
Solapur ST News : महिलांना सवलत, लालपरीला बरकत; मंगळवेढा आगाराच्या उत्पन्नात वाढ

सेवा प्रकार - ४ दिवसांचा पास दर  -

७ दिवसांचा पास दर 

गाडी ---   प्रौढ/मुले - प्रौढ /मुले 

साधी - ११७०/५८५ ----२०४०/१०२५

शिवशाही -१५२०/७६५--३०३०/१५२०

 ST News
ST Bus : एसटीची बस आसन व्यवस्था १ जानेवारी पासून बदलणार; अशी असणार व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com