esakal | एसटी कर्मचारी सर्वसाधारण बदल्यांच्या प्रतीक्षेत | St Employee
sakal

बोलून बातमी शोधा

st bus corporation
एसटी कर्मचारी सर्वसाधारण बदल्यांच्या प्रतीक्षेत

एसटी कर्मचारी सर्वसाधारण बदल्यांच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्य शासनाने यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी 25 टक्के सर्वसाधारण आणि 10 टक्के विशेष बदल्यांचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील बदल्या पार पडल्या मात्र अद्याप एसटी महामंडळातील सर्वसाधारण बदल्या रखडल्या आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष एकाच आगारात काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सध्या बदल्यांचे वेध लागले आहे.

हेही वाचा: मुंबईत मृत्यू नियंत्रणात, रुग्ण मात्र वाढलेलेच...

एसटी महामंडळातील बदल्या सुद्धा ऑगष्ट महिन्याच्या अखेर होण्याची अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे बदल्या प्रलंबित राहिल्या असून, लवकरचं बदल्यांची यादी जाहीर होणार असल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे सणासुदीच्या पूर्वीच बदलीसाठी पात्र असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यास मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

loading image
go to top