दिवाळीसाठी रायगड जिल्ह्यात एसटी प्रशासनाने कंबर कसली 

प्रमाेद जाधव
Thursday, 29 October 2020

रायगड जिल्हा विभागीय नियंत्रक यांच्या अखत्यारित अलिबाग, मुरूड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड, कर्जत, पेण असे आठ आगार आहेत. या आगारातून चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी गणेशोत्सवानंतर दिवाळीच्या सणात दरवर्षी नियोजन करून बस सोडण्यात येतात. यंदाही त्याचे नियोजन करण्यात आले आहे,

 अलिबाग : रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांत वास्तव्यास आहेत. दिवाळीत ते जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी येतात. त्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाली आहे. त्यानुसार अलिबाग, रोहा, महाड, श्रीवर्धन, मुरूड आणि माणगाव या आगारातून लातूर, मुंबई, उमरगा, पुणे या ठिकाणी 15 एसटी बस 1 नोव्हेंबरपासून सोडण्यात येणार आहेत.

 हे वाचा : लोकल सुरू होण्यासाठी पॉझिटीव्ही चिन्ह

रायगड जिल्हा विभागीय नियंत्रक यांच्या अखत्यारित अलिबाग, मुरूड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड, कर्जत, पेण असे आठ आगार आहेत. या आगारातून चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी गणेशोत्सवानंतर दिवाळीच्या सणात दरवर्षी नियोजन करून बस सोडण्यात येतात. यंदाही त्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. तसेच, जिल्ह्यातील आगारांमध्ये एसटीचे आरक्षणही सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले.

हे वाचा : शितल भानुशाली यांच्या मृत्यूचे गुढ वाढले

अशा बस सुटणार 
- अलिबाग आगारातून उमरगा एसटी बस सकाळी 8.30 वाजता सुटणार आहे. तर उमरगा येथून अलिबाग बस 7.30 वाजता 
- अलिबाग-लातूर एसटी आगारातून सकाळी 7 वाजता, तर लातूर येथून सकाळी 6.45 वाजता 
- रोहा आगारातून अक्कलकोट एसटी सायंकाळी 4.30 वाजता, तर अक्कलकोट येथून रात्री 9 वाजता 
- महाड आगारातून खुटील-नालासोपारा दुपारी 1.30 वाजता, तर नालासोपारा खुटील सकाळी 5.30 वाजता 
- पोलादपूर-ठाणे एसटी सकाळी 7.15 वाजता, तर ठाणे येथून दुपारी 12.30 वाजता 
- महाड-भांडूप दुपारी 2.30 वाजता, तर भांडूप येथून सकाळी 6.15 वाजता 
- श्रीवर्धन-नालासोपारा सकाळी 9.15 वाजता, तर नालासोपारा-अलिबाग एसटी रात्री 10.30 वाजता 
- बोरिवली एसटी सकाळी 5.15 वाजता, तर बोरिवली-श्रीवर्धन एसटी सकाळी 5.45 वाजता 
- श्रीवर्धन -भांडूप एसटी सकाळी 5.30, तर भांडूप-श्रीवर्धन दुपारी 12.30 वाजता 
- नानवेल-मुंबई एसटी सकाळी 5.45 वाजता, तर मुंबई नानवेल एसटी रात्री 9 वाजता 
- मुरूड-बोरिवली एसटी सकाळी 11 वाजता, तर बोरिवली येथून सकाळी 4.30 वाजता 
- मुरूड-मुंबई एसटी दुपारी 12 वाजता, तर मुंबई-मुरूड एसटी सायंकाळी 6.30 वाजता आणि रात्री 10.30 
- मुरूड-मुंबई तर मुंबई-मुरुड सकाळी 4.30 वाजता सोडली जाणार आहे. 
- मुरूड-रोहामार्गे बोरिवली सकाळी 9, तर बोरीवली येथून रात्री 12.30 
- माणगाव-पुणे एसटी सकाळी 11.30 वाजता, तर पुणे येथून दुपारी 3.30 वाजता 

दिवाळीत चाकरमनी मोठ्या संख्येने त्यांच्या मूळ गावी येतात. त्याच्या सोयीसाठी एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दिवाळीनंतर मुंबई-पुणे आदी ठिकाणी पुन्हा जाता यावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या एसटी सुरू केल्या आहेत. 
- अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST will provide better service in Raigad district on Diwali